आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेले काही दिवसांपासून रशियाकडून युक्रेनच्या राजधानीवर बॉम्बचा वर्षाव होत आहे. पण आम्ही जिथे आहोत, ते वसतीगृह सुखरूप आहे. इकडे नुकतेच मॉक ड्रिल पार पडले. आम्हाला धोक्याची सूचना मिळताच 'बंकर'मध्ये जाण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. आमचा पालकांसोबत संपर्क झाला आहे, लौकरच सुखरूप भारतात परतू, अशी माहिती युक्रेनमध्ये अडकलेल्या नगरच्या विद्यार्थ्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली आहे.
युक्रेनमधील झाप्रोझिया शहरात नगरचे २४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी किरण गोरे आणि इतरांशी दिव्य मराठी प्रतिनिधीने संपर्क साधून परिस्थिती जाणून घेतली. 'आम्हाला परत आणण्यासाठी ‘एअर इंडिया’ची दोन विशेष विमाने धाडण्यात येणार आहेत. ‘एअर इंडिया’ची ही दोन विमाने आज रोमानियाची राजधानी ‘बुकरेस्ट’साठी रवाना होतील. तर, युक्रेनमधून मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने पावले उचलली आहेत, असे विद्यार्थी म्हणाले.
पुढची सूचना मिळेपर्यंत वसतीगृह सोडू नये, अश्या सुचना विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत. सायरन वाजताच आम्हाला होस्टेलमध्ये असणाऱ्या बंकरमध्ये जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यासाठी नुकतेच एक मॉक ड्रिल घेण्यात आले, असे मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला शिकत असलेल्या किरण गोरे याने सांगितले. आम्हाला लवकरच भारतात घेऊन जाण्यासाठी भारत सरकारने पावले उचलली आहेत. त्यामुळे आम्ही लवकरच भारतात सुखरुप येऊ. आम्ही आमचे साहित्य देखील पॅकिंग केले आहे.’ कोणीही काळजी करू, नये असे आवाहन त्यांनी केले.
साक्षी बोराटे ही एमबीबीएस करण्यासाठी झापोरिझिया येथे गेलेली आहे. इंटरनेट बंद असल्याने पालकांशी संपर्क होत नव्हता. आता मात्र पालकांशी आमचा संपर्क झाला आहे. आमची भारतात जाण्याची सोय होत असल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे, असे तिने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.