आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्कामोर्तब:किसान सभेच्या राज्य अध्यक्षपदी उमेश देशमुख; तर सरचिटणीपदी डाॅ. नवले

अकोलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अकोल्यातील राज्य अधिवेशनात महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या केंद्रस्तरीय राज्य अध्यक्षपदाची त्रेवार्षिक जबाबदारी सांगली येथील उमेश देशमुख या नेतृत्वावर सोपवली. या अधिवेशनात किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष, डॉ. अशोक ढवळे, केंद्रीय कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद, किसान सभेचे नेते माजी आमदार जे. पी. गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले यांच्यासह ४०० पदाधिकारी सहभागी झाले होते. बुधवारी या अधिवेशनात किसान सभेचे राज्य अध्यक्ष म्हणून उमेश देशमुख यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष काॅम्रेड डॉ. अशोक ढवळे व कोषाध्यक्ष काॅम्रेड कृष्ण प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वाखाली किसान सभेचे त्रेवार्षिक कार्यकारिणी सल्लागार मंडळ अस्तित्वात आले. या सल्लागार मंडळावर काॅम्रेड एल. बी. धनगर व लहानू कोम (ठाणे-पालघर), उदयन शर्मा (अमरावती), दादा रायपुरे (बुलढाणा), शंकरराव दानव (यवतमाळ), जयसिंग माळी (नंदुरबार) व डॉ. आर. रामकुमार (मुंबई) याची निवड करण्यात आली. अकोले शहरातील अंबिका मंगल कार्यालयात सुरू असलेल्या किसान सभेच्या अधिवेशनाचे बुधवारी सायंकाळी केंद्रीय कोषाध्यक्ष काॅम्रेड कृष्ण प्रसाद यांच्या अंतिम भाषणाने सूप वाजले.

या राज्य अधिवेशनाने निवडलेले सल्लागार मंडळ आणि २९ सदस्यांचे राज्य पदाधिकारी मंडळाची निवड करण्यात आली. यात राज्य केंद्र व राज्य अध्यक्षपदी उमेश देशमुख यांची नव्याने नियुक्ती व शेतकरी नेते सरचिटणीसपदी डॉ. अजित नवले यांची फेरनिवड करण्यात आली.

तसेच कार्याध्यक्षपदी सुभाष चौधरी (नाशिक) व चंद्रकांत घोरखना (ठाणे-पालघर), उपाध्यक्षपदी जे. पी. गावीत, डॉ. उदय नारकर, किसन गुजर, सावळीराम पवार व सुनील मालुसरे (नाशिक), रडका कलांगडा (ठाणे-पालघर), अर्जुन आडे (नांदेड), यशवंत झाडे (वर्धा), सिद्धप्पा कलशेट्टी (सोलापूर), उद्धव पौळ (परभणी), माणिक अवघडे (सातारा), शामसिंग पाडवी (नंदुरबार), सहसचिवपदी इरफान शेख व रमेश चौधरी (नाशिक), चंद्रकांत धांगडा व चंद्रकांत वरठा आणि विजय काटेला (ठाणे), शंकर सिडाम (नांदेड), अजय बुरांडे (बीड), गोविंद आरदड (जालना), अनिल गायकवाड (बुलडाणा), महादेव गारपवार (अमरावती), अमोल वाघमारे (पुणे), सदाशिव साबळे (नगर) व कोषाध्यक्षपदी संजय ठाकूर (रायगड) यांची निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...