आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडसाद:समनापूर येथील प्राचीन बारवेवर अनधिकृत बांधकाम; कारवाईसाठी नागरिकांचा ठिय्या

संगमनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कारवाई न झाल्यास रविवारी कोल्हार-घोटी मार्गावर रास्ता रोकोचा इशारा

तालुक्यातील समनापूर येथील प्राचीन कालीन अहिल्याबाई होळकर यांच्या बारवेवर अनधिकृत बांधकाम करणारे राजू रोकडे यांच्यावर कारवाई करा, या मागणीसाठी संतप्त अहिल्याबाई होळकर विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या दिला. समनापूर येथे अहिल्याबाई होळकर यांची प्राचीन कालीन बारव आहे.

या बारवेवर येथील रोकडे यांनी अनधिकृत बांधकाम करत गाळे बांधण्याचा घाट घातला आहे. ही बाब होळकर मंचच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. ग्रामपंचायतने गाळ्यांना टाळे ठोकले होते. हा विषय तहसीलदार अमोल निकम यांच्या कार्यालयाकडे प्रलंबित आहे. तरी देखील ग्रामपंचातची परवानगी न घेता रोकडे याने गाळ्याचे कुलूप खोलून बांधकाम सुरू केले आहे. या संदर्भात तहसीलदार निकम यांना निवेदन देण्यात आले. बारवेची पाहणी करण्यासाठी आलेल्या रासपच्या कार्यकर्त्याना रोकडे कुटूंबियांनी शिवीगाळ केली. जागेच्या ७/१२ उताऱ्यात बारवचा कुठेही उल्लेख नाही. फक्त विहीर असाच उल्लेख आहे.

आम्ही आमच्या जागेत बांधकाम सुरू केले आहे. ग्रामपंचायतच्या परवानगीचा संबंध येत नाही. अहिल्याबाई होळकर बारव असा उल्लेख असलेला उतारा असेल तर मी जागा मोकळी करुन देईल, असे रोकडे यांनी यावेळी सांगितले. पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी हस्तक्षेप करत दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिले. ५-६ दिवसांत कायदेशीर कारवाई केली जाईल, असे लेखी ग्रामविकास अधिकारी नागरे यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. कारवाई न झाल्यास रविवारी कोल्हार-घोटी मार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.

गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन सुरु राहील
अहिल्याबाई होळकर विचार मंचचे कार्यकर्ते तेथे नसताना यांच्यावर गुन्हा दाखल केला. कार्यकर्त्यांना गोळीने उडवून देत हल्ले करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने ते संतप्त झाले आहेत. या विरोधात ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या देत आंदोलकांनी रोकडे यांनी गाळ्यांना लावलेले टाळे उघडले कसे? असा जाब ग्रामविकास अधिकारी सुनील नागरे यांना घेराव घालत विचारण्यात आला. रोकडेवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, असा पवित्रा मंचच्या कार्यकर्त्यांनी घेतला. यामुळे वातावरण तापले होते.

बातम्या आणखी आहेत...