आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान या विषयांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्टेप ॲप प्रकल्पांतर्गत डॉ. जयश्री थोरात यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून ऑनलाइन प्रणालीची माहिती दिली.
तालुक्यातील खांडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व संगमनेर खुर्दच्या अमृतेश्वर विद्यालय डॉ. थोरात यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुभाष गुंजाळ, उपसरपंच गणेश शिंदे, रजिस्टर बाबुराव गवांदे, प्राचार्य अशोक गुंजाळ, मुख्याध्यापक दत्तात्रय ठुबे, संतोष कर्पे, भारत गुंजाळ, अधिक गुंजाळ, रमेश अरगडे, जालिंदर अरगडे, निर्मला गोसावी, विजय हिंगे उपस्थित होते.
डॉ. थोरात म्हणाल्या, आमदार थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यातील सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित व विज्ञान करता आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शन मिळावे, याकरता विविध शाळांमधून स्टेप ॲप शैक्षणिक प्रकल्प अंतर्गत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना जेईई, नीट, एमपीएससी सारख्या महत्त्वाच्या परीक्षांसाठी मुंबई-पुणे या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. गणित व विज्ञान विषय हे पक्के झाल्याने त्यांना करिअरमध्ये महत्त्वाचे ठरणार आहे. हा उपक्रम तालुक्यात विविध शाळांमध्ये मोफत राबवला जात असून याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आभार प्राचार्य अशोकराव गुंजाळ यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.