आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:माझी वसुंधरा अभियानांतर्गत मढीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित

पाथर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारच्या पर्यावरण संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान मढी येथे राबवण्यात आले होते. या अभियानात श्रीक्षेत्र मढी गावाने उल्लेखनीय कामगिरी बजावल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने मढी ग्रामपंचायतीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

दहा हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायत गटांत मढी ग्रामपंचायतीने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा सन्मान सोहळा मुंबई येथे पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मढी ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले. मढी देवस्थानचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड, ग्रामसेवक, विठ्ठल राजळे, उपसरपंच रवींद्र आरोळे, शिवदास मरकड, ग्रामपंचायत सदस्य भानूविलास मरकड,भाऊसाहेब निमसे, रविंद्र मरकड यांनी मढी ग्रामस्थांच्या वतीने सन्मानपत्र स्वीकारले.

भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित पर्यावरणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. श्री क्षेत्र मढी ग्रामपंचायत यांनी दहा हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायत गटांमध्ये श्री क्षेत्र मढी गावाने तिसरा क्रमांक पटकावला.

बातम्या आणखी आहेत...