आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवन गौरव पुरस्कार जाहीर:स्वामी गोविंदगिरी महाराज यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्या शुभेच्छा

नगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आनंदोत्सव चारिटेबल ट्रस्टच्या वतीने जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले व अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष व मथुराच्या श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष विद्यावाचस्पती स्वामी गोविंदगिरी महाराज (आचार्य किशोरजी व्यास) यांना सन २०२१ या वर्षीचा ‘जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री व सहकारीता मंत्री अमित शहा यांनी त्यांना पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी दिली. अमित शहा यांनी पत्राद्वारे दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, स्वामी गोविंददेव गिरी महाराज तथा आचार्य किशोर व्यास यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे हे काम आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. पुरस्काराबद्दल त्यांना शुभेच्छा असल्याचे संदेशात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...