आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेवासे तालुक्यातील देवगड संस्थान येथे भगवान श्री दत्तांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न होत आहे. या उत्सवानिमित्ताने देवगडला मोठी यात्रा भरली आहे. बुधवारी दि. ७ डिसेंबर रोजी दत जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. परंतु त्याच दिवशी लोकसभेचे अधिवेशन असल्याने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी श्री दत्तांचे व समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी भास्करगिरी महाराज संस्थांनचे उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरी महाराज यांचे पूजन केले.
देवस्थानच्या वतीने भास्करगिरीजी महाराजांनी मंत्री कराड यांचा सन्मान केला. प्रारंभी श्री मंदिर संस्थानच्या वतीने बजरंग विधाते यांनी प्रास्ताविक केले. भास्करगिरी महाराजांनी केंद्र सरकारच्या वतीने देशभरात जे काही कार्य सुरू आहेत त्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन केले. प्रामुख्याने अध्यात्म क्षेत्रामध्ये चारीधाम विकास परियोजना, काशी विश्वनाथ कॉरीडाॅर, उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर विकास, श्रीरामचंद्रांची जन्मभूमी अयोध्येतील विकासकामे याविषयी गौरवोद्गार काढले.
याच धरतीवर महाराष्ट्रातील अध्यात्मिक तीर्थस्थळे विकसित व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. मंत्री कराड म्हणाले, केंद्र सरकार सर्वच स्तरातील जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. रस्त्याचे व रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण, जी २० परिषदेचे पंतप्रधानांना मिळालेले अध्यक्षपद, जागतिक पटलावर भारताला मिळणारा सन्मान, अर्थव्यवस्थेत झालेली सुधारणा, देव देश आणि धर्म याला अनुसरून कार्य सुरु आहे. डॉ. कराड यांचा साधेपणा सर्वांना भावला. सामान्य वारकऱ्यांबरोबर त्यांनी आमटी भाकरीचा प्रसाद ग्रहण केला. याप्रसंगी रखमाजी जाधव, पी एन देशपांडे, मनोज चोपडा, राम विधाते, किशोर गारुळे, महेश माळवदकर, भीमाशंकर नावंदे, बाळासाहेब पाटील, ज्ञानदेव लोखंडे, सुनील गर्जे, रामेश्वर शिंदे, यश देवकर, बंटी पठाडे, रामेश्वर तनपुरे, सदा जाधव, महेंद्र फलटणी, चांगदेव साबळे, अजय साबळे, मनोज सुर्वे, कल्याण जाधव, किरण धुमाळ, बाळू महाराज कानडे, सुभाष पवार, आदिनाथ पठारे, तात्या शिंदे आदींसह भाविक उपस्थित होते..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.