आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलाला (वय ४) घरामध्ये घेऊन जात त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना अहमदनगर शहरातील एका उपनगरात सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात राजेश काशिनाथ सोनार ऊर्फ सोनार बाबा (वय ५५, मूळ रा. भेंडा ता. नेवासा, हल्ली रा. बोल्हेगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या आरोपी सोनार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी स्वतंत्र फिर्याद दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सोमवारी रात्री फिर्यादी घरामध्ये स्वयंपाक करत असताना मुलाने त्यांच्याकडे पाच रूपयांची मागणी केली. फिर्यादीने पाच रूपये देताच मुलगा घराच्या खाली असलेल्या किराणा दुकानामध्ये गेला. १० ते १५ मिनिटे होऊन देखील मुलगा परत न आल्याने फिर्यादीने त्याचा घराच्या खाली शोध घेतला असता तो मिळून आला नाही. फिर्यादीला एका महिलेने सांगितले की, ‘तुमच्या मुलाला सोनार बाबा घेऊन गेला आहे’. तेव्हा फिर्यादी सोनार बाबाच्या घरी गेल्या असता सोनार बाबा मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करत असल्याचा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर फिर्यादी यांनी आरडाओरडा केला असता तेथे स्थानिक नागरिक जमा झाले. त्यांनी सोनार बाबाला चांगलाच चोप दिला असून तो जखमी झाला होता. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आरोपीचा मृत्यू झाला आहे.

तोफखाना पोलिसांनी पीडित मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून सोनार बाबाविरूध्द अनैसर्गिक अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियंका आठरे करत आहेत. दरम्यान उपचारादरम्यान आरोपीचा मृत्यू झाल्यामुळे याप्रकरणी स्वतंत्र फिर्याद दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...