आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक बँकेची निवडणूक:संघटना नसलेली मंडळे शिक्षक बँकेच्या निवडणुकीत : औटी

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक बँकेची निवडणूक तात्कालिक असून, संघटनाच नसलेली काही मंडळे या निवडणूकीत उतरली आहेत. त्यांचे ध्येय फक्त बँक आहे. शिक्षकांच्या प्रश्नाचे त्यांना काही देणे घेणे नाही. या निवडणूकीत अशा मंडळांना शिक्षक नाकारतील, असा टोला शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष तथा गुरूकुल मंडळाचे रा. या. औटी यांनी विरोधकांना लगावला.

नगर तालुका गुरुकल मंडळाच्या तालुका मेळाव्यात ते बोलत होते. शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर, अनिल आंधळे, नितीन काकडे, संजय धामणे, सुदर्शन शिंदे, भिवसेन चत्तर, दत्तात्रय चोथे, राजेंद्र ठाणगे, मधूकर मैड, नाना गाढवे, शरद धलपे, ऋषी गोरे, अविनाश काटकर आदी यावेळी उपस्थित होते. औटी म्हणाले, ज्या संघटना शिक्षकांसाठी अहोरात्र काम करतात, त्यांच्याशी संलग्न असलेली मंडळे बँकेच्या सत्तेवर येतात. परंतू शिक्षकांच्या प्रश्नासाठी जे कधी जिल्हा परिषदेची पायरी चढले नाहीत, ते बँकेतून पायउतार व्हायला तयार नाहीत. सत्ताधारी संचालक जर स्वाभिमानी असते, तर त्यांनी मुदत संपली तेव्हाच राजीनामे दिले असते. अशा गुरुमाऊलीला घरी बसवण्याची वेळ आता आली आहे, असेही औटी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...