आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:आगामी मनपा निवडणूक स्वबळावरच;काँग्रेसच्या बैठकीत सुतोवाच

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप, राष्ट्रवादीच्या युतीच्या काळात मोठे गैरव्यवहार झाले आहेत. ३२ कोटींच्या म्हासणवाटा महाघोटाळ्यांसारखे अनेक घोटाळे झाले आहेत. भ्रष्टाचार करत नगरकरांच्या पैशांवर डल्ला मारला गेला. याचा बुरखा काँग्रेस फाडणार आहे. दहशतमुक्त शहर आणि सर्वांगीण विकास हेच काँग्रेसचे ध्येय आहे. आगामी मनपा निवडणूक काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे. मात्र, स्व. अनिल राठोड यांची शिवसेना सोबत आली तर आमची त्यांच्यासोबत विकास आघाडी करण्याची तयारी असल्याचा प्रस्ताव शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे.

निवडणुकीला अवघे अकरा महिने उरले आहे. या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय मासिक आढावा काळे यांनी घेतला. काळे म्हणाले, रस्त्यांसाठी काँग्रेसने मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करत या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. राष्ट्रवादीच्या शहर लोकप्रिनिधींना तर जागा आली नाहीच, पण खासदार शहरातल्या रस्त्यांसाठी २५ कोटी मुख्यमंत्र्यांकडून आणण्यासाठी मुंबईला गेले. मात्र ते फक्त पाचच कोटी घेऊन आले. ते म्हणतात ३२ कोटींबाबत माहित नाही. पण मी जनतेचे पैसे वाया जाऊ देणार नाही.

राष्ट्रवादीच्या सहभागाच्या पुराव्यांसह म्हसणवाटा घोटाळ्यासाठी भाजपच्या पाच नगरसेवकांची पत्र रेकॉर्डवर आहेत. स्वपक्षाच्याच नगरसेवकांकडून सुरू असणारी लूट माहित असूनही कानावर हात ठेवणाऱ्यांचा दुटप्पीपणा सुज्ञ नगरकर ओळखून आहेत. लोकसभा निवडणुकीत शहाराचे विद्यमान नेते तुमच्या विरोधात उभे होते. ते नको म्हणून शहरवासियांनी तुम्हाला ५० हजारांचे मताधिक्य दिले. मात्र तुम्ही त्यांच्याच गळ्यात गळे घालून मिरवत नगरकरांचा विश्वासघात केला, अशी टीका काळे यांनी खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता केली.

दरम्यान, भविष्यात भाजप, राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर मनपा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेनेने एकत्र येण्याची गरज आहे. निवडणूक पूर्व युती व्हावी, अशी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास अनिल च्या विचारांची सत्ता निश्चितपणे मनपावर आणू, असा विश्वास काळे यांनी यावेळी व्यक्त केला.

बैठकीत प्रभागनिहाय आढावा
बूथ स्तरावर किमान दहा कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यात यावी. प्रभागातील युवक, महिला, नोकरदार, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, जेष्ठ नागरिक यांचा सहभाग ठेवावा. सर्व जातीय, धार्मिक घटकांना सामावून घ्यावे. नागरिकांच्या विविध समस्यांबाबत आवाज उठवावा. विकास कामांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचे पितळ कार्यकर्त्यांनी उघडे पाडावे, अशा सूचना काळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

बातम्या आणखी आहेत...