आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:हजारे यांच्या हस्ते आनंदऋषी महावीर भवनासाठी अद्ययावत वाहनाचे लोकार्पण

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्हा ही संतांची भूमी आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांनी मानवसेवा हीच ईश्वर सेवा असा महान संदेश दिला. मला स्वतःला आचार्यश्री तसेच पूज्य आदर्शऋषीजी महाराज यांचा सहवास लाभला आहे. त्यांच्या आशीर्वादाने जैन सोशल फेडरेशन आनंदऋषीजी हॉस्पिटल चालवताना ही शिकवण जपत आहे. दृष्टीदोष निवारणासाठी आनंदऋषीजी नेत्रालय सेवाभावी कार्य करीत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णा हजारे यांनी केले.

पाच वर्षात पन्नास हजारांहून अधिक यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया करून नेत्रालयाने अनेकांच्या जीवनात नवा प्रकाश आणला आहे. नगरमध्ये जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा, अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध करून देण्याचे काम जैन सोशल फेडरेशन करीत आहे. त्यामुळेच आज आनंदऋषीजी नेत्रालय महाराष्ट्रासाठी वरदान ठरत आहे, असेही ते म्हणाले.पारस उद्योग समूहाने या कार्यासाठी चांगली गाडी देऊन नेत्र रुग्णांची ने आण करण्याची व्यवस्था केली आहे.

अशा सामाजिक बांधिलकीतूनच समाजातील गरजूंना मदत होते. याठिकाणी दवा आणि दुवाचा अनोखा संगम आहे, असेही अण्णा हजारे म्हणाले. आनंदऋषीजी हॉस्पिटल अंतर्गत महावीर भवन येथे चालवण्यात येणाऱ्या आनंदऋषीजी नेत्रालयासाठी पारस उद्योग समूहाच्या वतीने २६ आसन क्षमतेची अद्ययावत गाडी देण्यात आली आहे. या गाडीचे लोकार्पण अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे झाले.याप्रसंगी कुंदन कांकरिया, नेत्र तज्ज्ञ डॉ.अशोक महाडीक, ॲड. श्याम आसावा, डॉ. स्वप्निल राणे, डॉ. विजय दगडे, रेटिना सर्जन डॉ. आदित्य नाकाडे, डॉ.विशाल तांबे, डॉ.नेहा भराडिया, डॉ. किरण शिंदे, डॉ. पूनम लंकेश्वर, नेत्रालयाचे प्रशासनाधिकारी आनंद छाजेड आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...