आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी केंद्रिय मंत्री व नगर अर्बन बँकेचे दिवंगत चेअरमन दिलीप गांधी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांना नगर अर्बन बँकेत संचालक मंडळ व अधिकाऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बँकेचे चेअरमन राजेंद्र अग्रवाल यांनी येणाऱ्या काळात बँकेची १०० टक्के वसुली करण्याचा संकल्प करीत योगदान देण्याची शपथ उपस्थित सर्वांना दिली.
याप्रसंगी सहकार पॅनेलचे नेते सुवेंद्र गांधी, संचालक अजय बोरा, भय्या गंधे, अशोक कटारिया, कमलेश गांधी, संपत बोरा, शैलेश मुनोत, मनेष साठे, ईश्वर बोरा, संदीप देसरडा, गिरीश लाहोटी, राहुल जामगावकर आदींसह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले, नगर अर्बन बँकेची थकबाकी वाढल्याने बँक अडचणीत आली. बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रभावी वसुली करणे हा एकमेव मार्ग आहे. त्या अनुषंगाने स्व. दिलीप गांधी यांच्या स्मृतिदिनी सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १०० टक्के वसुली करण्याचा संकल्प करून शपथ घेऊ. बँकेचे कर्ज घेतलेल्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हयगय व राजकारण न करता वसुलीकडे अधिक लक्ष द्यावे, असे सांगितले.
अशोक कटारिया म्हणाले, स्वर्गीय दिलीप गांधी यांनी वाढवलेल्या नगर अर्बन बँकेला संकटातून बाहेर काढणे व बँकेला पुर्नवैभव मिळवून देणे हाच संकल्प सर्वांनी करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले. यावेळी भय्या गंधे, संचालक संपत बोरा, ईश्वर बोरा, गिरीश लाहोटी आदींनी स्व. दिलीप गांधी आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त गेले. अजय बोरा यांनी प्रास्ताविक केले. राहुल जामगावकर यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.