आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:दिव्यांग मुलांना समजून घेऊन प्रेरित करण्याची नितांत गरज ; शबाना शेख

कोपरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पालकांनी आपल्या दिव्यांग मुलांना समजून घेणे व प्रेरित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी केले. येथील एसएसजीएम महाविद्यालयात नुकताच विद्यार्थी विकास मंडळ व दिव्यांग विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर उपक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.

यावेळी शेख यांनी सांगितले की, पालकांनी आपल्या दिव्यांग मुलांना समजून घेणे व प्रेरित करणे आवश्यक आहे. व्यंगाचे २१ प्रकार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दिव्यांगांना बँकेमधून कर्ज वगैरे सुविधा मिळविताना येणाऱ्या समस्यांचा त्यांनी उहापोह केला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते परमेश्वर कराळे यांनी दिव्यांगांविषयीचे कायदे, शिक्षण व लढा याविषयी सविस्तर माहिती दिली.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्रभारी प्राचार्य डॉ. रमेश सानप यांनी व्यंगाचे वेळीच निदान व उपचार होणे गरजेचे असते हे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रंजना वर्दे यांनी केले. तर सूत्रसंचालन देवकाते यांनी केले. माधव यशवंत यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या सर्व शाखांचे उपप्राचार्य, कार्यालयीन अधीक्षक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...