आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदी व प्रादेशिक भाषा या व्यक्तिगत भावनेसह गुणवत्तापूर्ण ग्राहकसेवा देण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. हिंदी भाषा ही कर्मचारी व ग्राहकांमध्ये संपर्क साधण्याचा एक महत्वाचा दुवा आहे. हिंदी व अन्य प्रादेशिक भाषांचा आम्ही आमच्या दैनंदिन कामात वाढत्या प्रमाणात वापर केला पाहिजे. त्याद्वारे ग्राहकांशी जोडून घेऊन आपला व्यवसाय वाढवता येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी केले.
यावेळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, बँकेचे कार्यकारी संचालक ए बी विजयकुमार व बँकेचे सरव्यवस्थापक आशिष पांडे आदी उपस्थित हाेते. ग्राहकांशी जोडून घेण्यासाठी त्यांच्याच भाषेत त्यांच्याशी संपर्क साध्यासारखा दुसरा उपाय नाही असे पांडे यावेळी म्हणाले.
आपल्या प्रादेशिक भाषांचा अभिमान बाळगतानाच हिंदी भाषेचा सुद्धा व्यापक स्तरावर वापर करण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी हिंदी भाषेचा जास्तीतजास्त उपयोग होण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. हिंदी स्पर्धेतील बक्षिसांचे देखील यावेळी वितरण करण्यात आले. उपसरव्यवस्थापक डॉ राजेंद्र श्रीवास्तव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वयन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.