आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिसंवाद:शेती उत्पादन वाढवण्यासाठी रोबोटचा वापर करा : अॅन्जेली

कोपरगाव शहरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजीवनी इंटरनॅशनल डिपार्टमेंटचा विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी उपक्रम

शेतीमालाचे अधिक उत्पादन, खर्चाची बचत, मनुष्य बळाचा कमी वापर या बाबी व शेती विषयक समस्या सोडवण्यासाठी रोबोटिक्स, आर्टिफिशिअल इंटिलिजन्स, मशिन लर्निंग, डीजिटल ट्वीन, अशा तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. शेती उत्पादन वाढवण्यासाठी रोबोटचा वापर करावा. याद्वारे पाण्याची व वेळेची बचत तसेच कामात अचुकता साधता येऊ शकते, असे प्रतिपादन जर्मनी मधील डिजिटल फ्युचर इन्व्ह्याॅनजिलिस्ट अॅक्सल अॅन्जेली यांनी केले.

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संजीवनी इंटरनॅशनल रिलेशनस् डिपार्टमेंटने विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी आयोजित शेती विषयक परिसंवादात अॅक्सल अॅन्जेली बोलत होते. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, काॅम्प्युटर विभागाचे प्रमुख डॉ. डी. बी. क्षिरसागर, संजीवनी इंटरनॅशनल रिलेशनस् डीपार्टमेंटचे डीन डॉ. महेंद्र गवळी, सर्व विभाग प्रमुख व डीन, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. अॅन्जेली यांचा जागतिक पातळीवर विविध देशांशी संपर्क आहे. अनेक देशांनी त्यांच्या कार्याची नोंद घेतलेली आहे. संजीवनीत त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधून कोपरगाव तसेच जवळपासच्या शेती विषयक समस्या कशा दूर करता येतील यावर मार्गदर्शन केले.

डॉ. क्षीरसागर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून अॅन्जेली यांना संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अंतर्गत संस्थांची माहिती दिली. अमित कोल्हे म्हणाले, संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे दिले जातात, परंतु हेच तंत्रज्ञान शेती विषयक समस्या सोडवण्यासाठी अथवा परवाडणारी शेती करण्यास कसे उपयोगी पडू शकते, हे या परिसंवादा मार्फत अधिक स्पष्ट होणारे आहे.

अॅन्जेली यांनी युरोप मधील शिक्षण पध्दती विषयी सांगितले की, तेथे विविध कंपन्या या त्यांना लागणाऱ्या मनुष्यबळातील स्कील सेटस् बाबत तेथील विद्यापीठांना अथवा कॉलेजेसला माहिती देतात, त्यानुसार शिक्षणाची अंमलबजावणी होऊन कुशल मनुष्यबळ निर्माण होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. युरोपियन देश आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शेतीतुन अधिक उत्पादन घेत आहे. युरोपमध्ये भारतात एका एकरात जे उत्पादन होते त्याच्या पाच पट, तर आफ्रिकेतील एका एकराच्या उत्पादनापेक्षा दहा पट उत्पादन युरोपमध्ये घेतल्या जाते, असे ते म्हणाले. सुत्रसंचलन विद्यार्थिनी मुग्धा लभडे हिने, तर आभार डॉ. महेंद्र गवळी यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...