आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:उत्कर्षा रुपवतेंचा काँग्रेस प्रवक्ते पदाचा राजीनामा

अकोले/संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव व राज्य महिला आयोग सदस्यां उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेसच्या प्रवक्ता या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा सादर करताना रुपवते यांनी म्हटले आहे, पक्षाच्या उदयपूर येथील नवसंकल्प शिबिरात ‘एक व्यक्ती, एक पद’ हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे आपण प्रवक्ता पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव म्हणून पक्ष संघटनेसाठी काम करण्यास मी कटिबद्ध होते व यापुढेही सदैव राहील, असे उत्कर्षा रुपवते यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...