आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवस:विविध सामाजिक उपक्रमांनी जि. प. चे. माजी सभापती सुनील गडाख यांचा वाढदिवस साजरा

सोनई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांचा वाढदिवस सोनई व खरवंडी जिल्हा परिषद गटातील अनेक गावांत विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. सोनई येथील जगदंबादेवी मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात युवकांनी गडाखांचा सत्कार केला. पसायदान आनंदवन परिवाराच्या जागेत वृक्षारोपन व साहित्याचे लोकार्पण करण्यात आले.

येथे गरजूंना किराणा साहित्य, भजनी मंडळास पखवाज, हार्मोनियम व साहित्य देण्यात आले. प्रास्ताविक संजय गर्जे यांनी केले. आनंदवन सदस्य राजेंद्र सानप, उदय पालवे, महावीर चोपडा यांनी गडाखांचा सत्कार केला. डाॅ. तुषार दराडे, किशोर घावटे, अॅड. सुनील गडाख, डाॅ.संतोष गुरसळ, सचिन काळे, अरुण घावटे, नवनाथ शिंदे, विनायक दरंदले, ऋषी जंगम यांनी कार्यक्रम यशस्वी केला. पानेगाव येथील सरपंच संजय जंगले यांनी रक्तदान शिबिर घेऊन वाढदिवस साजरा केला.

बातम्या आणखी आहेत...