आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा स्पर्धा:मुठेवाडगाव येथे विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात

श्रीरामपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कुल मुठेवाडगाव येथे बेलापूर शिक्षण संस्था अंतर्गत क्रीडा स्पर्धा झाल्या. संस्थेचे सचिव अॅड. शरद सोमाणी,सहसचिव दीपक सिकची, विश्वस्त बापूसाहेब पुजारी राजेंद्रप्रसाद खटोड, हरिचंद्र महाडिक,सहकारी सोसायटीचे चेअरमन डॉ. शंकरराव मुठे, शेषराव मुठे, मुख्याध्यापक श्रीराम कुंभार, एजाज खान आदी यावेळी उपस्थित हाेते.

या स्पर्धेत जेटीएस हायस्कूल, काशिनाथ पा मुरकुटे विद्यालय कमालपूर, न्यू इंग्लिश भेर्डापूर, न्यू इंग्लिश स्कुल मुठेवाडगाव, गोंडेगाव माध्यमिक विद्यालय गोंडेगाव आदी विद्यालयातील संघांनी भाग घेतला. कब्बडी स्पर्धेत जेटीएस हायस्कूल संघाने मुलांच्या संघाने प्रथम,मुरकुटे विद्यालय द्वितीय तर मुलींच्या गटात मुठेवाडगाव विद्यालयाने प्रथम,गोंडेगाव द्वितीय तर मुलांच्या गटात खोखो स्पर्धेत जेटीएस ने प्रथम गोंडेगाव द्वितीय ,तर मुलींच्या गटात गोंडेगाव संघाने प्रथम व जेटीएस ने द्वितीय क्रमांक पटकावला.जेटीएसचा यश खोसे व मुठेवाडगावची महेक पठाण सर्वोकृष्ट खेळाडू ठरले.

बातम्या आणखी आहेत...