आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:नगर शहरातील सिद्धीबागेत वटपौर्णिमा पूजनाचे आयोजन; महिला ग्रूपच्या वतीने उपक्रम

नगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सोशियल मीडिया वर चालवल्या जाणाऱ्या आम्ही मैत्रिणी, अहमदनगर ग्रूपतर्फे येत्या मंगळवारी, १४ जून २०२२ रोजी सकाळी ११ वाजता सिद्धी बाग, दिल्ली गेट येथे वटपौर्णिमेनिमित्त एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी महिला, परिसरातील जवळ असणाऱ्या वडाच्या झाडाची पूजा करत पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.

यामध्ये पारंपरिक पूजा केली जाते. यानिमित्त सिद्धी बागेत वडाचे रोप रुजवून येणाऱ्या पिढीला त्या वृक्षाची छाया मिळावी आणि पर्यावरणाला मदत व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. यावेळी उपस्थित महिलांमध्ये उखाणे स्पर्धा, फॅशन वॉक तसेच वन मिनिट गेम शोचे आयोजन करण्यात आले आहे. उखाणा स्पर्धेमध्ये पहिल्या विजेत्या महिलेला मंगलमूर्ती ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची नथ बक्षीस दिले जाणार आहे. द नॅचुरो ब्युटी अँड हेअल्थ केअर, अश्विनी एजन्सी, सॉईल कल्चर नर्सरी, कान्हाज कुकींग क्लास, गायत्री फूड्स, सिद्धी बाग, शांती साउंड यांच्यातर्फे विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी नगरसेवक बाबासाहेब वाकळे पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमास येताना महिलांनी लाल साडी परिधान करून यावी तसेच पूजेचे साहित्य स्वतः आणणे आवश्यक आहे. या कार्यक्रमात महिलांनी उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आयोजक दीपाली देऊतकर, वीणा मुंगी, ऋतुजा पाठक आणि दिप्ती शुक्रे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...