आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वितरण‎:सोनई येथे वात्सल्य पुरस्कारांचे‎ गडाखांच्या हस्ते झाले वितरण‎

सोनई‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुजाता विद्यालयाच्या मैदानावर‎ उभारण्यात आलेल्या भव्य मंचावर‎ महंत उध्दव महाराज मंडलिक,‎ साहित्यिक डाॅ. संजय कळमकर व‎ ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाखांच्या‎ हस्ते वात्सल्य पुरस्कारांचे उत्साहात‎ वितरण झाले .‎ हिंगोणी ( ता. नेवासे) येथील‎ वात्सल्य प्रतिष्ठानच्या वतीने‎ आध्यात्मिक कार्य पुरस्कार रामेश्वर‎ महाराज कंठाळे, सामाजिक‎ पत्रकारिता पुरस्कार पत्रकार‎ विनायक दरंदले, शैक्षणिक कार्याचा‎ पुरस्कार भानुदास कुरकुटे,‎ शेतीक्रांतीचा पुरस्कार पाराजी शिंदे,‎ तर खेलरत्न पुरस्कार आर्या शिंदे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांना प्रदान करण्यात आला.‎

प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष किरण‎ सोनवणे यांनी केले. हिंगोणी सेवा‎ सोसायटीचे अध्यक्ष शिवाजीराव‎ सोनवणे, काॅन्ट्रक्टर बी. एस.‎ सोनवणे, संजय सोनवणे, आदेश‎ सोनवणे व कुणाल सोनवणे यांनी‎ उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कार्यक्रमास सोनईचे सरपंच धनंजय‎ वाघ, उपसरपंच प्रसाद हारकाळे,‎ सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष‎ अप्पासाहेब निमसे, मुळाचे माजी‎ अध्यक्ष सीताराम झिने, सोमनाथ‎ कराळे, उदय पालवे, जयवंत लिपाने‎ उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश‎ हापसे यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...