आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अहमदनगर:बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्याने पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवले, पारनेर तालुक्यातील धक्कादायक घटना

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोपी राजाराम तरटे आणि अमोल तरटे यांच्यावर आदिवासी समाजातील 26 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडितेने तक्रार दाखल केली होती. आरोपींनी पीडितेला हा गुन्हा मागे घेण्याचा दबाव टाकला. पीडितेने त्यांची मागणी मान्य न केल्याने आरोपींनी थेट अत्याचारित पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेट्रोल टाकून पेटवले. या घटनेत मुलगी गंभीर जखमी आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून काल रात्री सुपा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस अधिकारी अजित पाटील हे करीत आहेत.