आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास मंडळ:कोतूळ सेवा सोसायटीत कोतूळेश्वर‎ शेतकरी विकास मंडळाचा विजय‎ ; राजेंद्र देशमुख यांच्यासह आनंदोत्सव

अकोले‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोतूळ आदिवासी विविध‎ कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ‎ ‎ संचालक मंडळाच्या निवडणुकीत ‎ ‎ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ‎ ‎ सीताराम देशमुख व कोतूळ ‎ ‎ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच‎ राजेंद्र देशमुख यांच्या‎ नेतृत्वाखालील कोतुळेश्वर शेतकरी ‎ ‎ विकास मंडळाने सर्वच्या सर्व जागा ‎ ‎ जिंकून विजय मिळवला. त्यांनी पुणे ‎ ‎ येथील बाजार समितीचे निवृत्त‎ प्रशासक बी. जे. देशमुख व जिल्हा‎ परिषद सदस्य रमेश देशमुख या‎ बंधूंच्या नेतृत्वाखालील शेतकरी‎ विकास मंडळाचा पराभव केला.‎ १५ जागांपैकी कोतूळ आदिवासी‎ सोसायटीत भटक्या विमुक्त जाती‎ जमाती मतदार संघातून चंदू नाना‎ पवार हे बिनविरोध निवडून आले.‎ यामुळे मतदारांना उर्वरित १४‎ जागांच्या मतदान प्रक्रियेला सामोरे‎ जावे लागले. यासाठी १२ जूनला‎ मतदान होऊन सायंकाळी‎ मतमोजणीनंतर निकाल जाहीर‎ करण्यात आले. निकाल जाहीर‎ झाल्यानंतर शेतकरी विकास पॅनलचे‎ ‎ नेते बी. जे. देशमुख व रमेश‎ देशमुख यांच्या समर्थकांनी‎ मतमोजणी केंद्र सोडले. कोतूळेश्वर‎ शेतकरी विकास पॅनलचे नेते‎ सीताराम देशमुख व राजेंद्र देशमुख‎ यांनी आपल्या समर्थकांसह फेटे‎ बांधून व डिजे लावून जल्लोष‎ केला. निवडणूक निर्णय अधिकारी‎ अल्ताब शेख यांनी काम पाहिले.‎ त्यांना सहायक निवडणूक‎ अधिकारी दादाभाऊ साबळे यांनी‎ मदत केली. या निवडणुकीत‎ कोतूळेश्वर शेतकरी विकास‎ मंडळाने सर्व १५ जागांवर विजय‎ मिळवून शेतकरी विकास मंडळाचा‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ पराभव केला. कोतुळेशवर‎ शेतकरी विकास मंडळाचे विजयी‎ उमेदवारांत आदिवासी कर्जदार‎ मतदार संघातून गेणू भिकाजी गोडे,‎ विशाल नामदेव गोडे, बाळासाहेब‎ लक्ष्मण लेंभे, संदीप रघुनाथ लेंभे,‎ चंदन गणपत वायाळ, भागा गंगाराम‎ शेळके यांनी विजय मिळवला.‎ महिला राखीव मतदार संघातून‎ विजयी उमेदवारांत उषा नामदेव‎ गोडे, सुनंदा नामदेव बांबळे, इतर‎ मागास वर्गीय मतदार संघातून‎ बाळासाहेब संपत बेळे हे विजयी‎ झाले. सयाजी देशमुख सर्वधिक‎ ५२७ मतांनी विजयी झाले.‎ कोतूळ आदिवासी विकास सेवा सोसायटीच्या निवडणूकीत कोतुळेश्वर‎ शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविल्यानंतर नेते सीताराम‎ देशमुख व राजेंद्र देशमुख यांच्यासह आनंदोत्सव साजरा केला.‎ कोतूळ आदिवासी विकास सेवा सोसायटीच्या निवडणूकीत कोतुळेश्वर‎ शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविल्यानंतर नेते सीताराम‎ देशमुख व राजेंद्र देशमुख यांच्यासह आनंदोत्सव साजरा केला.‎

बातम्या आणखी आहेत...