आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसेवा मंडळ:देवळाली सोसायटीत विकास मंडळाचा विजय ;  सभासदांनी मतपेटीतून विरोधी लोकसेवा मंडळाला नाकारले

देवळाली प्रवरा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत देवळाली प्रवरा विकास मंडळाच्या उमेदवारांनी सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय मिळवला. सभासदांनी मतपेटीतून विरोधी लोकसेवा मंडळाला नाकारले.

देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीसाठी रविवारी सोसायटीच्या शांताबाई मंगल कार्यालयात मतदान पार पडले. २२१४ मतदारांपैकी २१६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विकास मंडळाच्या सर्व उमेदवार विजयी घोषित होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष केला. शहरातून डीजेच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकडो कार्यकर्ते ,सभासद सहभागी झाले होते.यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम, प्रीती कदम, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, सचिन ढुस, माजी नगराध्यक्ष गोरख मुसमाडे, मुरलीधर कदम, धोंडिभाऊ मुसमाडे, केरू पटारे, अनंत कदम, वसंत कदम, अजित चव्हाण, भारत शेटे, सचिन शेटे, प्रशांत मुसमाडे, विशाल मुसमाडे, किशोर गडाख, संदीप कदम, अमोल कदम, सुधाकर कदम, मोहसिन शेख, सचिन कोठुळे, डॉ.संदीप मुसमाडे, प्रशांत कोठुळे, शशिकांत खाडे, रामेश्वर तोडमल, ऋषिकेश उंडे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

या निवडणुकीत विकास मंडळाचे शहाजी कदम, सूर्यभान गडाख, संतोष चव्हाण, राजेंद्र ढुस, सुदाम भांड, उत्तम मुसमाडे,मंजाबापू वरखडे, बाबासाहेब शेटे,स्वरूपा कदम, संगीता वाळुंज, राजेंद्र पंडित, दिलीप मुसमाडे, सुधीर टीक्कल हे उमेदवार विजयी झाले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किरण आव्हाड यांनी काम पाहिले तर त्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुभाष कदम यांनी मदत केली.

सेवा संस्थेत मोठ्या मताधिक्याने विजय होईल असेच अपेक्षित होते,सभासदांनी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यावर विश्वास ठेवून मोठे मताधिक्य दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कारभार नवनिर्वाचित संचालक मंडळ करील, असे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...