आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्रिया:विकासकामे, मजबूत संघटनामुळे सर्व ग्रामपंचायतीवर विजय ; विखे

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सातत्याने गावपातळीवर केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून सुरु असलेली विकास प्रक्रिया, कार्यकर्त्यांनी बांधलेले उत्तम संघटन व निवडणुकीत घेतलेल्या परिश्रमांमुळेच राहाता तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींवर विजयाने शिक्कामोर्तब केले, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींवर विजयाबद्दल महसूलमंत्री विखे यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

विखे म्हणाले, तालुक्यात गावपातळीवर विकासाची प्रक्रिया राबविताना कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांचा सहभाग महत्वाचा असतो. या विकास प्रक्रियेमुळेच सामान्य माणसाचे पाठबळ हे संघटनेच्या पाठीशी असल्याचे सिद्ध झाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना सुरु आहेत. राज्यातही या योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आता ग्रामीण भागाच्या विकासाला पुढे घेवून जाण्यासाठी निर्णय प्रक्रिया राबवत आहे.

याचा सकारात्मक परिणाम या निवडणुकीत दिसून आल्याचे विखे म्हणाले. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर या विकास प्रक्रियेला अधिक गती मिळाली आहे. जनतेच्या मनातील सरकार आल्यामुळे विकास कामांबरोबरच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचाही लाभ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून लोकापर्यंत पोहोचवण्‍यास मदत झाली. या कार्याचे यश या निवडणुकीच्या निमित्ताने आधोरेखित झाल्याचे ते म्हणाले

बातम्या आणखी आहेत...