आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:सतर्कतेमुळे टळू शकते सायबर फसवणूक

नगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे हे प्रकार टळू शकतात, असे प्रतिपादन सायबर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी केले.पोलिस रेझिंग डेनिमित्त रामलाल ललवाणी मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने संजीवनी कॉलनी येथे सायबर सिक्युरिटी व जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस ते बोलत होते.

यावेळी रणशेवरे म्हणाले, स्मार्टफोन व सोशल मीडिया हे सायबर फसवणुकीचे मूळ आहे. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना अतिशय सतर्क रहावे. बँक महावितरण फोन पे गुगल पे ॲमेझॉन आर्मी किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून बोलत असल्याची बतावणी करणाऱ्यांना आपल्या बँकेची, एटीएमची, क्रेडिट कार्डची माहिती किंवा ओटीपी देऊ नये. तसेच त्यांच्या सांगण्यावरून कोणतेही ॲप डाऊनलोड करू नये.

अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून किंवा आर कोड स्कॅन करू नये. ओएलएक्स फेसबुक इंस्टाग्राम क्विकर यासारख्या सोशल मीडिया साईट वरून अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करू नये त्यांना पैसे पाठवू नयेशेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी लोभापोटी अनोळखी व्यक्तींना पैसे पाठवू नयेतलोन ॲप वरून लोन घेणे टाळा टाळावे, या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेतफेसबुक इंस्टाग्राम जीमेल व्हाट्सअप मध्ये टू स्टेप वेरिफिकेशन ही सेटिंग करून आपले सोशल मीडिया अकाउंट हॅकिंग होण्यापासून वाचवता येऊ शकते.

याचबरोबर सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींच्या आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत आदी मार्गदर्शक सूचना रणशेवरे यांनी यावेळी केल्या. यावेळी सायबर पोलिस स्टेशनचे अभिजीत अरकल यांनी सायबर फसवणूक कशाप्रकारे होते याची उदाहरणे देऊन यापासून कसे वाचावे याबाबत मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...