आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा संपन्न:किकबॉक्सिंग स्पर्धेत विजय पाटोळे द्वितीय

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाको इंडिया कॅडेट, ज्युनियर आणि वरिष्ठ राष्ट्रीय किकबॉक्सिंग (एम/डब्ल्यू) चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेत १७ वर्ष वयोगटात राहुरीचा विजय पाटोळे दुस-या क्रमांकाचा मानकरी ठरला.चंदीगड विद्यापीठ घारूआन (मोहाली) येथे या स्पर्धा संपन्न झाल्या.

५१ किलो वजनगटात अंतिम फेरीत १७ स्पर्धकांचा सहभाग होता. या चुरशीच्या लढतीत प्रतिस्पर्ध्याला हरवून द्वितीय क्रमांक मिळविल्याने विजयची अगामी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयला शुभम ठुबे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल डाॅ. दिलीप कुलकर्णी, सुचेता कुलकर्णी यांनी विजयचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...