आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:गावठी कट्टा बाळगणारा अटकेत

नगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवरा संगम येथून २ जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेतले. सोन्या उर्फ संतोष पाडुरंग बंगाळ (वय २९, रा. रोटेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

प्रवरा संगम बस स्थानक येथे एक मुलगा देशी बनावटीचा कट्टा व काडतुसे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकातील सपोनि गणेश इंगळे, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, मनोज गोसावी, पोना ज्ञानेश्वर शिंदे, पोना शंकर चौधरी, पोना दिपक शिंदे, पोकॉ शिवाजी ढाकणे व चापोहेकॉ संभाजी कोतकर यांना कारवाईचे आदेश दिले. पथकाने प्रवरा संगम बस स्टॉप येथे सापळा रचून सोन्या उर्फ संतोष पाडुरंग बंगाळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोना ज्ञानेश्वर शिंदे यांनी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...