आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता दुरुस्ती:ठेकेदार व सदस्यांच्या रस्ता रुंदीच्या वादात ग्रामस्थांचे हाल

सात्रळ3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सात्रळ बाजारतळावरील रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण ठेकेदार व सदस्यांमधील रुंदीकरणावरून असलेल्या वादात काम रेंगाळले. रस्ता दुरुस्ती सुरुवातीस पडलेली खाडीचे डिग,आधी पसरलेली खडी गोळा करण्यासाठी वापरलेल्या जेसीबीमुळे पडलेल्या खड्ड्यात पावसाचे गुडघ्याइतके साचले.

पाण्यामुळे आठवडे बाजारात बाजारकरूंचे, विक्रेत्यांचे प्रचंड हाल झाले. मंगळवारी आलेल्या पावसामुळे बाजारतळावर सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्यात बाजारतळावर रस्तारुंदीवरून ठेकेदार व ग्रामपंचायत सदस्य यांच्यात झालेल्या वादामुळे रस्त्याचे काम रखडले असून ग्रामस्थांना, बाजारकरूना या रस्त्याने जाताना कसरत करावी लागत आहे. हीच परिस्तिथी प्रवरा नदी पूल ते सात्रळ गट ऑफिस चौक रस्त्यांची झाली.

मोठ्या प्रमाणात खड्डे असलेल्या रस्त्याची रुंदीकरण व डांबरीकरण मंजूर झाले असूनही काम चालू न झाल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत. या परिसरातील अनेक रस्त्यांच्या कामासंदर्भात स्थानिक लोक प्रतिनिधींकडे अनेक वेळा ग्रामस्थानी लक्ष वेधून सुद्धा रस्त्यांचे काम होत नसून या कामांमध्ये झारीतील शुक्राचार्य, ठेकेदार की इतर कोण आहेत हे शोधण्याची ग्रामस्थांवर वेळ आली असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

बातम्या आणखी आहेत...