आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ राजकारण:जनतेतून निवडलेल्या सरपंचाकडून‎ ग्रामस्थांना मोठ्या अपेक्षा : भालसिंग‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचायतराज पद्धतीमध्ये जनतेतून निवडून आलेल्या‎ सरपंचाकडून ग्रामस्थांच्या मोठ्या अपेक्षा असतात.‎ जनतेने निवडलेला सरपंच गावाला विकासाची दिशा‎ देणार आहे. गावाच्या विकासासाठी निवडणुकीनंतर‎ राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज‎ असल्याचे प्रतिपादन जिल्हा कार्याध्यक्ष विजय‎ भालसिंग यांनी केले. अखिल विश्‍व वारकरी परिषद‎ (महाराष्ट्र राज्य) अहमदनगर शाखेच्या वतीने चिचोंडी‎ पाटील (ता. नगर) येथील जनतेमधून निवडून आलेले‎ सरपंच शरद पवार व उपसरपंच जयश्री माधजी कोकाटे‎ यांचा भालसिंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.‎ त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष साहेबराव‎ पाचारणे, अण्णा कोकाटे, चंद्रकांत पवार, अमोल‎ खडके, जितू गाडे, कल्याण जगताप, राम जगताप,‎ ज्ञानेश्‍वर ठोंबरे, गंगाधर दरेकर, नामदेव थोरवे, शंकर‎ कोकाटे, तुकाराम कोकाटे आदी उपस्थित होते.‎ जिल्हाध्यक्ष साहेबराव पाचारणे यांनी गावात सर्व‎ राजकीय मंडळी विकासासाठी एकत्र येऊन काम करत‎ आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ‎ सर्वसामान्यांना मिळण्यासाठी नवनिर्वाचित सरपंचांनी‎ प्रयत्नशील राहून काम करावे. सर्व समाजाला बरोबर‎ घेऊन विकास कामे करण्याची अपेक्षा व्यक्त केली.‎

बातम्या आणखी आहेत...