आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आजचा निकाल म्हणजे राजकीय परिवर्तनाचा प्रारंभ, विनायकराव देशमुख यांचा विश्वास

अहमदनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आजचा निकाल म्हणजे देशातील राजकीय परिवर्तनाचा प्रारंभ असून, 2024 मध्ये केंद्रात देखील परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही," असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव विनायकराव देशमुख यांनी शनिवार (13 में ) ला व्यक्त केला.

कर्नाटक विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रीया येत आहेत. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे विनायकराव देशमुखांनी राज्यघटनेची तत्वे पायदळी तूडवण्याचा प्रकार जनतेने नाकारल्याचे म्हटले.

काय म्हणाले विनायक देशमुख?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस बहुमताच्या पुढे गेले आहे.या निकालावर प्रतिक्रिया देताना देशमुख म्हणाले, "देशातील जनतेला कायमच धर्माच्या नावावर फसवणे आता शक्य नाही, हे या निकालाने स्पष्ट केले आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ संवाद आणि प्रसार माध्यमांच्या द्वारे गाजावाजा करणे, हे भारतीय जनतेला आवडत नाही, हे देखील सिद्ध झाले आहे .याशिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे वारंवार पायदळी तुडवण्याचा प्रकार देखील जनतेने स्पष्टपणे नाकारलेला आहे. असे देशमुख यांनी यावेळी सांगितले.

भारत जोडोतून सामान्य जनता संघटित

ते पुढे म्हणाले,सत्ता, संपत्ती आणि सरकारी यंत्रणेच्या गैरवापराद्वारे विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. मात्र राहुल गांधींसारख्या नेत्याने हे सर्व दडपणं झुगारून भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला संघटित केले. आणि त्याचाच परिणाम कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत दिसून आला आहे.

2024 ला सत्ताबदल निश्चित

देशमुख म्हणाले,आता महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षावर मोठी जबाबदारी असून, भारत जोडो यात्रेचा प्रभाव अधिक सकारात्मक होण्यासाठी कसोशीने प्रयत्न केल्यास आणि राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी एकमताने भारतीय जनता पक्षासमोर सक्षम पर्याय ठेवल्यास महाराष्ट्रात देखील 2024 मध्ये सत्ता बदल निश्चित आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सामान्यांना न्याय मिळणार

देशाच्या पातळीवर राहुल गांधींच्या रूपाने एक अभ्यासू आणि तरुण नेतृत्व उदयास आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात देशातील लोकशाही अधिक बळकट होईल आणि सर्वसामान्यांना न्याय मिळेल असेही देशमुख यांनी सांगितले.