आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत:शरणपूर वृद्धाश्रमासाठी ध्वनिक्षेपक संच भेट, बहुजन समाजाचे नेते पोपटराव जीरे यांच्या पुढाकार

नेवासे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खडका रोडवर असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमाच्या प्रांगणात होणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी नेवासा येथील जीरे कुटुंबियांच्या वतीने ध्वनिक्षेपक संच भेट देण्यात आला. हरिभाऊ जीरे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून बहुजन समाजाचे नेते पोपटराव जीरे यांच्या पुढाकाराने वृद्धांना फळे वाटून हा उपक्रम राबविण्यात आला. शरणपूर वृद्धाश्रमाचे चालक रावसाहेब मगर यांनी स्वागत करत वृद्धाश्रम चालवत असतांना वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष पत्रकार बाळासाहेब देवखिळे व मार्गदर्शक पत्रकार सुधीर चव्हाण यांच्या खंबीर साथीमुळे वृद्धाश्रमासाठी दाते हे योगदान देऊन हातभार लावतात. वृद्धाश्रम कमिटीचे मार्गदर्शक पत्रकार सुधीर चव्हाण म्हणाले, अनेकजण आपल्या आईवडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ येथे येऊन अन्नदानाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतात, लहान मुलींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्त्री जन्माचे स्वागत उपक्रम येथे राबविला जातो, महिला भगिनींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा सन्मान ही येथे केला जातो, त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद वृद्धाश्रमातील उपक्रमांना मिळत आहे. ध्वनिक्षेपक संच भेट दिल्याने येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांना बहर येईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी पोपटराव जीरे, अशोकराव जीरे, छोटूराम जीरे, बदाम महाराज पठाडे, मुळाचे माजी संचालक जनार्दन शेळके, गोरख घुले, राजेंद्र काळे, अनिल ताके, परवेझ पठाण, संजय वाघमारे,पिंटूभाऊ जीरे, बालूभाऊ जीरे, संतोष सोनकांबळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...