आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर जिल्ह्यातील २०३ ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्यामुळे रविवार (१८ डिसेंबर) ला उर्वरित १९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ७७० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी २ हजार ३१० कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे.
नगर जिल्ह्यातील २०३ ग्रामपंचायतींसाठी ९ नोव्हेंबरला निवडणुका जाहीर झाल्या होत्या. सर्वाधिक संगमनेर तालुक्यातील ३७ ,अकोले तालुक्यातील ११, जामखेड तालुक्यातील ३, कर्जत तालुक्यातील ८, कोपरगाव तालुक्यातील २६, नगर तालुक्यातील २६, निवासी तालुक्यातील १३, पारनेर तालुक्यातील १६, पाथर्डी तालुक्यातील ११, राहाता तालुक्यातील १२, शेवगाव तालुक्यातील १२, श्रीरामपूर तालुक्यातील ६, राहुरी तालुक्यातील ११ व श्रीगोंदे तालुक्यातील १० ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका जाहीर झाल्या होत्या.२०३ ग्रामपंचायत पैकी १० ग्रामपंचायतीं पूर्णपणे बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १९३ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान होणार आहे.
मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीसाठीचा प्रचार शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता संपुष्टात आला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून या निवडणुकीची ग्राम स्तरावर रणधुमाळी सुरू होती. एकूण जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीमधील १ हजार ९६५ जागापैकी ३०१ एक जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर दहा ग्रामपंचायतीं बिनविरोध झाले आहेत. १५ सरपंचांच्या निवडी देखील बिनविरोध झालेल्या आहेत. दरम्यान मतदानासाठी १ हजार ५२३ बॅलेट युनिट (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) व ९८५ मतदान काउंट यंत्र असणार आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही पोलिसांचा फौजफाटा मागविण्यात आला आहे. प्रत्येक केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यात या आठ ग्रामपंचायती बिनविरोध
जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सोनलवाडी, श्रीवंडी राहता तालुक्यातील लोहगाव, नेवासे तालुक्यातील खुपटी, श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर, वांगे खुर्द, नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा, श्रीगोंदे तालुक्यातील बनपिंपरी या आठ ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत. दरम्यान कर्जत जामखेड मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला असून, आमदार राम शिंदे, आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ग्रामपंचायती खेचून आणण्यासाठी चढाओढ लागली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.