आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोल्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसह १३० सहकारी दूध उत्पादक संस्था ची शिखर संस्था असलेल्या अमृतसागर दूध संघासाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २०२२ ते २७ या कालावधीतील संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) दीपक पराये यांनी जाहीर केला.
अमृतसागर दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष वैभव पिचड व उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांच्या एकमुखी नेतृत्वाला एक वर्षापूर्वी ग्रहण लागले. संचालक मंडळातील काही संचालक हे अगस्तिचे अध्यक्ष वतत्कालीन उपाध्यक्ष सीताराम गायकर यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश करते झाल्यानंतर अध्यक्ष वैभव पिचड व उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे हे ५ विरूद्ध ९ असे अल्पमतात आले. तेव्हापासूनच पिचड पितापुत्र विरोधकांकडून टिकेचे लक्ष होत आहेत. अगस्तीतील पराभवाचा वचपा आता अमृतसागर दूध संघातील आपला सत्तेचा गड कायम ठेवून तेथील सामाजिक व राजकीय परिणाम शाबूत ठेवण्यासाठी पिचड पितापुत्रांकडून कोणत्या व्यूहरचना आखण्यात येईल, हेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यासाठीच या निवडणुकीतील संभाव्य उमेदवार ठरवण्यास रविवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी ११.३० वाजता अध्यक्ष वैभव पिचड यांच्या पुढाकारातून शेतकरी विकास मंडळाची बैठक आयोजित केली आहे.
आमदार डॉ. किरण लहामटे, अगस्तीचे अध्यक्ष सीताराम गायकर, उपाध्यक्ष अशोक भांगरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले, डॉ. अजित नवले, कारभारी उगले, रिपाइंचे विजय वाकचौरे यांच्यासह अगस्तितील शेतकरी समृद्धी मंडळातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अमृतसागर दूध संघ ताब्यात घेण्याचे मनसुबे वा प्रयत्न पिचड पितापुत्र कसे रोखणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
सर्वसाधारण मतदारसंघ १० जागा, महिला राखीव मतदार संघ २ जागा, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती. जमाती व विमुक्त जाती भटक्या जमाती. प्रव प्रत्येकी १ अशा १७ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना डाॅक्टरांनी त्यांना मुंबईबाहेर न जाण्यासह विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अमृतसागर दूध संघाचा राजकीय गड माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील सर करावा लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.