आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:ज्ञानेश्वर मंदिरातून वृक्षप्रसाद योजना महाराष्ट्रात सुरू करणार; ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचे प्रतिपादन

नेवासे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकादशीच्या शुभमुहूर्तावर नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिरातून वृक्षप्रसाद योजना महाराष्ट्रात सुरू करणार असल्याचे प्रतिपादन सह्याद्री देवराई प्रतिष्ठानचे संस्थापक व सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.

नेवासे येथील श्रीक्षेत्र ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरास त्यांनी बुधवारी भेट दिली. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्ञानेश्वर देवस्थान विश्वस्त कृष्णा पिसोटे, रामभाऊ जगताप, भगवान सोनवणे, जनसंपर्क अधिकारी भय्यासाहेब कावरे, नगराध्यक्ष सतीश पिंपळे उपस्थित होते. संस्थांतर्फे सयाजी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी मंदिर परिसरातील वृक्षारोपणाची पाहणी केली. यावेळी तेथे असलेल्या नैसर्गिक मोकळ्या जागेला पाहून त्यांनी वृक्षप्रसाद योजना महाराष्ट्रात सुरू करीत असताना नेवासे तीर्थक्षेत्र प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. वारकऱ्यांना ज्ञानेश्वरांच्या प्रसादरुपी दिले जाणारे हे वृक्ष त्यांचे बरोबरच समाजाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतील. तसेच शहरातील श्रीक्षेत्र काशी विश्वेश्वर मंदिर परिसरातील आमराईच्या वृक्षारोपणाची पाहणी केली. काही बदल करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

बातम्या आणखी आहेत...