आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश प्राप्त:संस्कार बालभवनची वृष्टी पटेल भरतनाट्यम विशारद

संगमनेर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ (मुंबई) द्वारा आयोजित भरतनाट्यममध्ये संगमनेरच्या संस्कार बालभवनची वृष्टी धीरज पटेल विशारद परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. बालभवनमधील दैनंदिन नृत्य वर्गात शिकणार्‍या वृष्टीने या परीक्षेत ८५ गुण मिळवत यश प्राप्त केले. गीता परिवाराच्या वतीने सुरु असलेल्या संस्कार बालभवनमध्ये संस्कार शिबिरासह मुलांच्या कलागुणांना वाव देणासाठी विविध प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले जाते. नृत्य प्रशिक्षक पवित्रा कृष्ण भट यांच्या मार्गदर्शनाखाली वृष्टी हिने भरतनाट्यमचे धडे गिरवले.

वयाच्या तिसर्‍या वर्षी बालसंस्कार केंद्राच्या अभ्यासक्रमात ती सहभागी झाली. मुलींना शिकताना पाहून तिने भरतनाट्यम वर्गात प्रवेश घेतला. दोन वर्षानंतर प्रारंभिक परीक्षेत ती उत्तीर्ण झाली. येथील शिक्षकांच्या नेतृत्वाखाली दुबई, नेपाळसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित विविध महोत्सव आणि स्पर्धांमध्ये सादरीकरण करण्याची संधी तिला मिळाली. बालभवनच्या संचालिका अनुराधा मालपाणी यांनी समर्पितपणे मदत केल्याचे वृष्टीने सांगितले.

बालभवनने अनेक मुलींना व्यासपीठ उपलब्ध आहे. ज्यातून भरतनाट्यम शिकले, तो माझ्या नृत्य कारकिर्दीचा सर्वात मोठा पाया आहे. सहाय्यक पालक व सोनाली महापात्रा यांचे सहकार्य मिळाल्याने आपण यश संपादन केल्याचे वृष्टी पटेलने सांगितले. सध्या ती ध्रुव ग्लोबल स्कुलमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. भविष्यात भरतनाट्यममध्ये पदवी प्राप्त करण्याचे ध्येय तिने बाळगले आहे. यशाबद्दल गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...