आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेरप्रस्ताव सादर:मनपा कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगासाठी प्रतिक्षाच

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतील कायम अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतनश्रेणी लागू करण्यास मान्यता देण्यासाठी फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना नगर विकास विभागाने मनपा आयुक्तांना दिल्या आहेत. त्यामुळे सातव्या वेतन आयोगासाठी पुन्हा प्रतीक्षाच करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कायम कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश आहेत. मात्र, त्यासाठी महापालिकेला आर्थिक परस्थितीवर आधारीत सविस्तर अहवाल सादर करून त्याला शासनाची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने महासभेची मंजुरी घेऊन शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.

मात्र, अद्यापही या शिफारसी लागू झालेल्या नाहीत. सातवा वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगार खर्चात दर महिन्याला सुमारे वीदोन कोटींची वाढ होणार आहे. त्यामुळे महापालिकेला आर्थिक परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश शासनाने दिलेले होते. आता शिफारासीच्या लागू करण्याबाबत फेरप्रस्ताव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...