आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:जून ते नोव्हेंबर पर्यंतचे वीजबिल माफ करा; महाविकास आघाडीचा आंदोलनाचा इशारा

नगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जून ते नोव्हेंबर या कालावधीतील वीजबिल माफ करावे, रोहित्र बंदचा निर्णय रद्द करावा, अन्यथा २२ नोव्हेंबरला ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाविकास आघाडीतर्फे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे करण्यात आली आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार, आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण म्हस्के, रोहिदास कर्डिले, राजेंद्र भगत, जिल्हा सरचिटणीस प्रकाश पोटे यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले आहे. महावितरणने हा निर्णय बदलून वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास न देता सुरळीत वीजपुरवठा करावा. महावितरणने बिल माफ करून रोहित्र बंद करण्याचे धोरण थांबवावे अन्यथा मंगळवारी (२२ नोव्हेंबर) सकाळी अकरा वाजता महाविकास आघाडीच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...