आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्ही सेंटर ते प्रोफेसर चौक ते भिस्तबाग चौकापर्यंत रस्त्यासह सावेडी उपनगर परिसरातील अतिक्रमणे तत्काळ हटविण्यात यावीत, अशी मागणी माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. येत्या ११ दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.सावेडी उपनगरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी वेळोवेळी मागणी केली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना आपण कारवाई करण्याचे आदेश देऊनही कारवाई होत नाही. गुलमोहररोड चौक ते सुरभि हॉस्पीटलपर्यंत, जिवनधारा हॉस्पिटल रोड, स्वामी समर्थ मंदिर मागे, सावेडी नाक्याजवळील, वडगाव रोड डुंगरवाल हॉस्पीटल ते मनपा वडगांव पंपिंगस्टेशनपर्यंत, तोफखाना पोलिस स्टेशन ते झोपडी कॅन्टीन रस्त्यापर्यंत, मॅक्स केअर हॉस्पीटल ते गायकवाड कॉलनी रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ काढावेत. भिस्तबाग चौक ते तोफखाना पोलिस स्टेशनपर्यंत सर्रास रस्त्यावर उभ्या केल्या जात आहेत. मनपा अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. ही अतिक्रमणे येत्या ११ दिवसात न काढल्यास १५ डिसेंबर रोजी आयुक्त दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.