आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य बँक घोटाळा प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे १२ डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी टाकू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी दिला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात सावंत यांनी म्हटले अहे की, लातूरचे माजी आमदार माणिक जाधव यांनी या घोटाळ्याचे काही तपशील जनतेसमोर आणले. शरद पवार व अजित पवार या काका-पुतण्याने राज्यातील साखर कारखाने कवडीमोल किमतीत विकत घेऊन ते स्वकीयांना वाटप केले. राज्य बँकेकडून थकहमीपोटी दिलेल्या रकमा आपल्या खासगी मालकीच्या असल्याप्रमाणे वापरल्या. पण पहाटेच्या शपथविधीनंतर ८० तासांच्या सरकारच्या काळात राजकीय मजबुरी म्हणून इरिगेशनसह या सर्व फाइल्स बंद केल्यात काय? असा प्रश्न त्यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.