आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जरे हत्याकांड:तिघांविरुद्ध वॉरंट जारी ; 9 नोव्हेंबरला रोजी होणार पुढील सुनावणी

नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी जनार्दन अकुला चंद्राप्पा (रा. हैदराबाद) याला सुनावणीस गैरहजर राहिल्याने न्यायालयाने एक हजार रुपये दंड ठोठावला. तर अन्य तीन आरोपी शेख इस्माईल, अब्दुल रहमान आणि राजशेखर चकाली (तिघे रा. हैदराबाद) गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता ९ नोव्हेंबरला होणार आहे.

खून प्रकरणात बाळ बोठेसह १२ आरोपी आहेत. यापैकी हैदराबाद येथील रहिवाशी असलेल्या चार आरोपींनी खटल्यातून दोषमुक्त करण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. या अर्जांच्या सुनावणीच्या वेळेस गैरहजर राहिल्याने आरोपी अ‍ॅड. जनार्दन अकुला चंद्राप्पा यासएक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. उर्वरित तीन गैरहजर आरोपींना वॉरंट काढण्यात आले असल्याची माहिती मूळ फिर्यादीतर्फे काम पाहणारे अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी दिली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश रमेश गोसावी यांच्यासमोर याखटल्याची सुनावणी सुरू आहे. दरम्यान, या अर्जातील तिघे गैरहजर राहिल्याने त्यांच्या अर्जावरपुढील सुनावणी ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे अर्ज निकाली काढल्यानंतर याप्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध दोष निश्चितीसाठी तारीख जाहीर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...