आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य शहरात अनेक ठिकाणी साचले पाणी:अवघ्या दहा मिनिटांत पाणीच पाणी; गणेश मंडळ कार्यकर्त्यांची तारांबळ

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी नगर शहरात पावसाने हजेरी लावली. मात्र, अवघे दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या पावसामुळे मध्यवर्ती शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. प्रोफेसर कॉलनीत पावसामुळे गणेश मूर्ती व पुजेचे साहित्य विक्रीसाठी लावलेले स्टॉल पाण्याखाली गेले होते. त्यामुळे विक्रेत्यांची तारांबळ उडाली. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्थाच उपलब्ध नसल्याने गणेशोत्सवात गणेश मंडळांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पावसाळी गटार या बंद पाईप गटार संकल्पनेतून बंद केल्या आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांपासून शहरात प्रमुख रस्त्यांवरून पाणी वाहते. मोठा पाऊस झाल्यास अनेक चौकांना तळ्यांचे स्वरुप येते. तर रस्त्यांना नद्यांचे स्वरूप येते. मंगळवारी अवघे दहा मिनिटे झालेल्या पावसामुळे अनेक चौकात पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना वाहने चालवताना कसरत करावी लागली. तसेच पाणी साचल्यामुळे काही गणेश मंडळांची धावपळ झाली.

बातम्या आणखी आहेत...