आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:जिल्ह्यात 41 ठिकाणचे पाणी नमुणे दूषित

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या ४१ जलस्त्रोतांचे जलनमुणे दुषीत असल्याचा अहवाल वरिष्ठ ‌भूवैज्ञानिक कार्यालयाने दिला आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जलशुद्धीकरणाबाबत संबंधित ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. बहुतांश ठिकाणी सार्वजनिक विहिरींचाही जलस्त्रोत उपलब्ध आहे. शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. तसेच अशुद्ध पाणी पिल्यास आरोग्यविषयक समस्या उद्भवतात.

यापार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडे दुषीत जलस्त्रोतांच्या मासिक अहवलांची नोंद ठेवली जाते. वरिष्ठ भुवैज्ञानिक कार्यालयाने १ एप्रिल ते नोव्हेंबरअखेर १२ बदाप २२६ पाणीनमुण्यांची तपासणी केली, त्यात ५३३ ठिकाणचे नमुणे दुषीत आढळले. नोव्हेंबर महिन्यात १ हजार ५९६ नमुणे तपासल्यानंतर ४१ ठिकाणी पाणी दुषीत असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने हा अहवाल दिला आहे. ज्या ठिकाणी नमुणे दुषीत आहेत, त्याठिकाणी जलशुद्धीकरण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

जलशुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा (टिसीएल) वापर केला जातो. टाक्यांमध्ये साठविलेल्या या पाण्यात टीसीएल पावडर टाकण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. स्थानिक पातळीवर नेमण्यात आलेल्या जलसुरक्षकांमार्फत पाणी नमुणे तपासणी पाठवले जातात. जलशुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या टिसीएल पावडरची गुणवत्ताही तपासली जाते.

जलशुद्धीकरणाची पावडर निकृष्ट
जलशुद्धीकरणासाठी पाण्याच्या टाक्यांमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो. या पावडरचे नमुणे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेमार्फत तपासण्यात आले. अहवालानुसार महिनाभरात १६ गावांतील पावडर नमुणे निकृष्ट आढळून आले आहेत. एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत हा आकडा १०२ वर पोहोचला आहे. त्यामुळे गुणवत्ता टिकवण्याचे आव्हान आहे.

दूषित पाण्याची गावे
गुहिरे, कातळपूर, मालेगाव, तेरूंगण (अकोले), कारवाडी, शिगानापूर, मढू बु. (कर्जत), धोत्रे बु., ढोकी, रूईछत्तीशी, नारायणगव्हाण, जातेगाव, गटेवाडी, म्हसोबाझाप (पाथर्डी) शंकरवाडी, शेकडे, खिर्डी, घाटशिरस, कोल्हार, खाडगाव, जावळवाडी, अल्हनवाडी, निपाणी (पाथर्डी), हासनपूर, पाथरे बु. (राहाता), कणगर, चांदेगाव, निंभेरे (राहुरी), वनकुटे, सावरगाव घुले, वरूडीपठार (संगमनेर).

बातम्या आणखी आहेत...