आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:मिरावली पहाडावर पाणी टंचाई‎

नगर‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर तालुक्यातील पीर मिरावली दर्गा हे एक नगर‎ तालुक्यातील ''क'' वर्ग तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी‎ राज्यासह देशभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात.‎ परंतु, मागील अनेक दिवसांपासून येथे पाणीटंचाई निर्माण‎ झाल्याने भाविकांचीही गैरसोय होत आहे.‎ यापार्श्वभूमीवर भक्त समितीने प्रशासनाला निवेदन दिले‎ असले तरी पाणीप्रश्न मार्गी लागलेला नाही.‎

मिरावली पहाड भक्त समितीच्या वतीने‎ जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेला महिनाभरापूर्वी निवेदन‎ दिले होते, परंतु प्रशासनाने हा प्रश्न सोडवला नाही. या‎ ठिकाणी पाणी विकत घ्यावे लागत आहे, जर आठ‎ दिवसात पिण्याची पाण्याची व्यवस्था झाली नाही तर‎ भाविक आंदोलनाचा पर्याय निवडणार आहे.‎ हजरत सय्यद इसहाक शाह पीर मिरावली दर्गा‎ कापूरवाडी भागात आहेत. या ठिकाणी अस्तीत्वात‎ असलेली पाणी योजना कार्यान्वीत नाही. त्यामुळे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ येणाऱ्या भाविकांचे व पर्यटकांचे पाण्याअभावी हाल होत‎ आहेत. आठवडाभरात जर पाणीपुरवठा सुरळीत झाला‎ नाही, तर पुणे, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद येथील‎ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा‎ भाविकांनी दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...