आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशमूर्ती कृत्रिम जलकुंडात विसर्जित:‘पाण्याचे स्त्रोत ही गावाची संपत्ती, ते चांगले ठेवणे जबाबदारी’

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने पर्यावरणपूरक पध्दतीने उत्साहपुर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या! चा गजर करीत शाडूच्या मातीची गणेशमूर्ती कृत्रिम जलकुंडात विसर्जित करण्यात आली.

संस्थेच्या वतीने गावात जल प्रदूषण टाळण्यासाठी घरच्या घरी जलकुंडात गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत सदस्य नाना डोंगरे व मंदा डोंगरे यांचे हस्ते गणेशाची उत्थापन पूजा झाली. पाण्याचे स्त्रोत ही गावाची संपत्ती असून, ते चांगले ठेवणे प्रत्येक ग्रामस्थांची जबाबदारी आहे, असे डोंगरे यावेळी म्हणाले.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या विहीर, बारव आदी ठिकाणी विसर्जित केल्याने मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होते. हे जलसाठे दूषित करण्याऐवजी लाडक्या बाप्पाची पर्यावरणपूरक शाडूच्या मातीची गणेश मुर्ती कृत्रिम जलकुंडात विसर्जित करणे काळाची गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.या गणेशोत्सवात संस्थेने मतदार जागृती व पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण केले. व्यसनमुक्ती जनजागृती देखील करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...