आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:‘वात्सल्य’कडून पशू-पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था; डॉ. पवळ यांच्याकडून मातीच्या कुंड्या देऊन पशु-पक्ष्यांची सेवा, विठ्ठलराव वाडगे यांचे गाैरवाेद्गार

श्रीगोंदे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्यात पशु-पक्षी वाढत्या तापमानात पाण्याअभावी मृत्युमुखी पडू नये म्हणून दरवर्षी वात्सल्य बहुउद्देशीय संस्थेमार्फत डॉ. शिवाजी पवळ हे ठिकठिकाणी मातीच्या कुंड्या देऊन खऱ्या अर्थाने पशु-पक्ष्यांची सेवा करत आहेत. मागील १२ वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. या माध्यमातून ते पशु-पक्ष्यांची सेवा करीत आहेत, असे गौरवोद्गार वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट सोसायटी चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांनी काढले.

वात्सल्य संस्थे वतीने गुरुवारी, ५ मे रोजी पशू-पक्ष्यांसाठी शहरात ११ ठिकाणी कुंड्या ठेवल्या. ज्या ठिकाणी बेवारस पशु-पक्ष्यांचा वावर असतो, अश्या ठिकाणी कुंड्या ठेवण्यात आल्या. विठ्ठलराव वाडगे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी वाडगे बोलत होते.

वाडगे म्हणाले, सध्या उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअस पुढे पोहोचला आहे. अशा परिस्थितीत पशू-पक्षी पाण्याअभावी दगावण्याची शक्यता असते. वात्सल्य संस्थेच्या माध्यमातून शिवाजी पवळ हे गेली १२ वर्षांपासून, पशु पक्षी वाचवा निसर्ग टिकवाया अभियानाअंतर्गत मोफत कुंडी बसवून मोठे सेवा कार्य करत आहेत. याशिवाय पवळ यांनी गावरान गाय पशुपालकांनी संभाळाव्यात म्हणून मोफत रेतन कार्यक्रम यशस्वी राबवला. याचा लाभ घेऊन प्रत्येकाने गावरान गाय पाळावी, असे आवाहन केले.

शिवाजी पवळ म्हणाले, उन्हाळ्यात आपण मातीच्या कुंडी बनवून प्राणी मित्र नागरिकांना देण्यास प्रारंभ केला. त्यामुळे पशु-पक्ष्यांच्या चांगल्या पाण्याची सोय होते, असे ते म्हणाले. यावेळी प्रा. मधुकर खोमणे, शिवसेनेचे हरिभाऊ काळे, बापू माने, संतोष बोरुडे, शांताराम पोटे, शहाजी खेतमाळीस, विकास बोरुडे, संतोष भोईटे, प्रशांत लवांडे, शाहरुख शेख, विखे आदींसह नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...