आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:पाणी योजनेवर उद्या शटडाऊन एक दिवस विलंबाने होणार पाणीपुरवठा

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी (५ नोव्हेंबर) महावितरणकडून दुरुस्तीकामांसाठी घेण्यात येणाऱ्या शट डाउनमुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागास एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेकडून कळवण्यात आले आहे. दुरुस्ती कामासाठी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत शट डाउन घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुळानगर, विळद या ठिकाणाहून उपसा होणारा पाणी उपसा बंद राहणार आहे. त्यामुळे शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. या शटडाउन वेळेत महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा योजनेवरील दुरूस्तीची कामेही केली जाणार आहेत.

त्यामुळे शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाइपलाइन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारसनगर, बुरूडगाव रोड, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर या सकाळी ११ नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास पाणी पुरवठा होउ शकणार नाही. या भागास रविवारी (६ नोव्हेंबर) पाणी पुरवठा होणार आहे.

रविवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी या भागात पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. या भागातील पाणी पुरवठा हा रविवार ऐवजी सोमवारी (७ नोव्हेंबर) करण्यात येणार आहे.

सोमवारी पाणी पुरवठा होवू घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको, स्टेशन रोड, विनायकनगर या भागात पाणी पुरवठा होणार नसून तो मंगळवारी (८ नोव्हेंबर) करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...