आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेलेल्या कामाचे श्रेय घेण्याची अथवा वारंवार त्यावर चर्चा करण्याची आमची सवय नाही. पण विरोधक त्या स्वभावाचे भांडवल करून बदनाम करीत असतील, तर कार्यपद्धतीत बदल करून कामे व केलेले सहकार्य बोलून दाखवू. कामे आम्ही करतो, पावत्या दुसरेच फाडतात, अशा प्रवृत्तींना नवखे कार्यकर्ते बळी पडतात. घरचीच माणसे कामाला येतात, पाहुण्यांना पाहुण्यांसारखेच ठेवा, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील भालगाव, मीडसांगवी, कासारवाडी, खरवंडी आदी गावांचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्गाच्या समस्येबाबत शासकीय विश्रामगृहावर डॉ. विखे यांच्या भेटीसाठी आले.
गेल्या अनेक दिवसांपासून पैठण-पंढरपूर व खरवंडी-राजुरी-बीड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत मार्ग निघत नव्हता. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत व लोकप्रतिनिधींना जुमानत नव्हते. वादामुळे रस्त्याचे काम अपूर्ण राहिले होते. याबाबत महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, दत्तात्रय पठाडे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, अॅड. प्रतीक खेडकर, अजय रक्ताते, जगन्नाथ गुळवे, राजेंद्र हिंगे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ. विखे म्हणाले, अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांची आडवणूक करू नये. विकास कामांतील अडचणी सोडवण्यासाठी दोन दोन वर्षे लागत असतील, तर ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही.
अडचणी सोडल्यावर लोकांच्या मनात काम करणाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवून पूजार्पण करणाऱ्यांची नवीन टोळी तैयार होत असेल, तर अशा प्रवृत्तींना सुद्धा लोकांनी रोखायला हवे. येथे मार्च अखेर दोन्ही महामार्गामुळे विस्थापित झालेल्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले. कल्याण-विशाखापट्टण, बारामती-औरंगाबाद, पैठण-पंढरपूर, औरंगाबाद-पुणे अशा महामार्गांमुळे येत्या पाच वर्षांत पाथर्डी तालुका दळणवळणाच्या दृष्टीने जिल्ह्यात अग्र क्रमांकावर राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नगर जिल्ह्यातील सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रे नजरेपुढे ठेवून विकासाचा नवा कॅरिडोर व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू असून गहिनीनाथ गड, भगवानगड, तारकेश्वर गड, मोहटा देवी, मढी, वृद्धेश्वर, हनुमान टाकळी, दगडवाडी, चिचोंडी, शिंगणापूर, शिर्डी अशा मार्गाबाबत सर्वेक्षण व्हावे, यासाठी प्रयत्न हाती घेतले आहेत, असेही विखे यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी यावेळी आभार मानले.
मुळा धरणाच्या पाण्यासाठी संयुक्त बैठकीत निर्णय घेऊ दळणवळणाशिवाय कोणतीही विकास कामे शक्य नसल्याने लोकांनी सहकार्य करावे. पाथर्डी तालुक्यातील काही गावांनी मुळा धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी मिळावे, अशी मागणी केली त्यावर आमदार मोनिका राजळे यांच्याबरोबर संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेऊ, असेही नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी पाथर्डी येथे शेतकऱ्यांसमोर बोलताना सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.