आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:आम्ही केवळ नारळ फोडण्याचा कार्यक्रम करत नाही; आमदार मोनिका राजळे यांचे प्रतिपादन

पाथर्डी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजळे कुटुंबाने विकास कामात कधीही राजकारण केले नाही. आगामी काळ विविध निवडणुकांचा आहे. विशेषत: नगरपालिका,जिल्हा परिषद, बाजार समितीच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी अशा संस्थांचा माध्यमातून सत्ता कोणाच्या ताब्यात घ्यायची याचा विचार व्हावा. आम्ही केवळ नारळ फोडण्याचा कार्यक्रम करत नाही निवडणुका डोळ्यापुढे ठेवून कार्यक्रम केला, अशी टीका चुकीची आहे, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

शहराच्या मध्यवर्ती तालुका खरेदी विक्री संघाच्या जागेत माजी आमदार स्व.राजीव राजळे व्यापारी संकुलाचा भूमिपूजन कार्यक्रम तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री यांचे हस्ते झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल राजळे,माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, सहाय्यक निबंधक भारती काटुळे,ज्येष्ठ नेते संजय बडे व भगवान आव्हाड,अशोक चोरमले,अशोक गर्जे,भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर आदी उपस्थित होते.

आमदार राजळे म्हणाल्या, माजी आमदार स्व. राजीव राजळे यांची स्वप्नपूर्ती या संकुलाच्या माध्यमातून होणार आहे. येत्या दोन वर्षात काम पूर्ण होऊन शहराच्या वैभवात भर पडणार आहे. मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांना संधी उपलब्ध होऊन बाजारपेठेतील उलढाल वाढू शकेल. स्व.राजळे यांनी तालुक्यात सहकार मजबूत करून विविध संस्था टिकवल्या.सार्वजनिक जीवनाची सुरुवात त्यांनी तालुका संघातून केली. विकास कामात कधीही राजकारण केले नाही. त्याचेच फलस्वरुप तालुक्यात अनेक विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या निवडणुका बिनविरोध होत आहेत. वृद्धेश्वर साखर कारखान्याने यंदा पाच लाख सात हजार टन उसाचे विक्रमी गाळप करून ऊस उत्पादकांना चांगला भाव दिला. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने व्यापारी संकुलाच्या बांधकामासाठी कर्ज उपलब्ध करून दिले.

गेल्या अनेक दिवसांपासून विविध तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन आता बांधकाम सुरू केले जाणार आहे. आगामी काळात अनेक विकास कामे तालुक्यात सुरू होणार आहेत. नगर रस्त्यावरील संघाच्या जागेवर येत्या काळात नवा उपक्रम सुरु करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.सर्व कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी यांनी एकजूट दाखवून पक्षाची ताकद मतदार संघात दाखवावी, असे आवाहन राजळे यांनी केले. प्रास्ताविक संघाचे चेअरमन बाळासाहेब अकोलकर यांनी, सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी, तर आभार संजय फुंदे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...