आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील तीन दिवसांपासून भाविकांच्या गर्दीने गजबजलेली अवतार मेहरबाबांची समाधी टेकडी आज सुनी सुनी झाली. तीन दिवसांच्या उत्सवानंतर राहिलेले भाविक व स्वयंसेवक गावच्या परतीच्या वाटेवर लागले आहेत. एकमेकांना ‘जय बाबा’, ‘जय मेहेर’ म्हणत पुढील वर्षी अमरतिथीला भेटण्याचे आश्वासन देत जगातील व राज्यातून आलेले भाविक परतल्याने मेहेरबाबांची समाधी टेकडीवर शांतता पसरली आहे. नगर-दौंड रस्ता ओलांडून टेकडीवरच्या समाधीकडे निघालं, की दोन्ही बाजूंनी वडाची झाडं भाविकांचे स्वागत करतात.
वाहनांसाठी शेजारीच लहानसा घाटरस्ता आहे. पहिल्या महायुद्धात लष्करी छावणीसाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीचा उपयोग मेहेरबाबांना प्रारंभी वास्तव्यासाठी केला होता. आता तिथं बाबांनी वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय उभारले आहे. शेजारील खोलीत ग्रंथालय आणि वरच्या मजल्यावर मेहेरबाबांचा जीवनप्रवास उलगडून दाखवणारी फोटो गॅलरी आहे. शेजारी मेहेरबाबांची विश्रांतीची खोली आणि स्वयंपाकघर आहे. आजही ते जसंच्या तसं जपलं आहे. समाधी मंदिराशेजारी असलेल्या छोट्या पत्र्याच्या खोलीत मेहेरबाबा राहत. ती खोलीही अजून जतन केली आहे.
देश-विदेशातील मेहेरप्रेमी इथं येतात, पण कुठेही गोंगाट नाही, अस्वच्छता नाही. स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांचा ताफा नाही. सेवेत प्रभुत्व ही मेहेरबाबांची शिकवण अंमलात आणत, प्रत्येक जण येथे सेवाभाव जपत असतो. त्याचे अनुकरण प्रत्येकाने करायला हवे..
पाणीटंचाई असतानाही जपली झाडेसमाधी मंदिराच्या टेकडीवर हजारो झाडं लावली असून, पाणीटंचाई असतानाही ती उत्तमरित्या वाढवली आहेत. टेकडीच्या मागच्या बाजूला असलेलं (भक्तनिवास) तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं वास्तूशिल्प आहे. मेहेरबाबांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांची भव्य चित्रं असलेली मेस, शेजारच्या उद्यानात असलेले संगमरवरी शिल्प, तसेच चित्रं काढलेल्या टाइल्सनं सजवलेली भिंत तर पाहत राहावी, अशी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.