आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:आम्ही कुणावर कधीही खोट्या केसेस दाखल केलेल्या नाहीत : सुरेंद्र थोरात

राहुरी7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार

टाकळीमिया गावातील शिवस्मारकाला विरोध केलेला नसतानाही स्नेहल सांगळे या महिलेची बदनामी तसेच तिच्या पतीवर पोलिसात खोटा गुन्हा दाखल करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा जाहीर निषेध करत असल्याचे रिपाइं जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी म्हटले.

टाकळीमिया गावात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने सोमवारी दुपारी राहुरी पोलिस स्टेशनवर मोर्चा नेण्यात आला. शहरातील नवीपेठ मार्गे राहुरीच्या पोलिस स्टेशनवर मोर्चा गेल्यानंतर सभेत रूपांतर झाले. छत्रपती शिवाजी महाराज व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयजयकाराच्या घोषणांनी पोलिस स्टेशनचा परिसर दणाणून गेला होता. थोरात म्हणाले, टाकळीमिया ग्रामसभेत शिवस्मारकाला विरोध केलेला नसून शिवस्मारका बरोबर इतरही महापुरुषांचे स्मारक व्हावे, अशी भूमिका संबंधित महिलेने मांडली होती. मात्र, हे मान्य नसल्याने टाकळीमियाच्या गावपुढाऱ्यांनी महिलेला विरोध दर्शवून नको, त्या घटनेला रंग देण्याचा प्रयत्न केला, तो निषेधार्थ आहे. आम्ही कधीही खोट्या केसेस व अट्रॉसिटी दाखल केलेल्या नसून राहुरी तालुक्यात आम्हाला वातावरण बिघडवायचे नाही. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करत खरे खोटे जनतेसमोर आणावे. तालुकाध्यक्ष विलास साळवे म्हणाले, टाकळीमियातील शिवस्मारकाला संबंधित महिलेने पाठिंबा दिला होता. या महिलेने बोलण्याची इच्छा व्यक्त केल्याने तिला मारहाण झाली, हे शिवरायांचे नाव घेणाऱ्यांना शोभते का? ग्रामसभेतील ग्रामसेवक व सरपंच यांनाही सहआरोपी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी साळवे यांनी केली. मोर्चात श्रीकांत भालेराव, बाळासाहेब गायकवाड, अजय साळवे, रमा धिवर, विनोद नन्नवरे, आशिष शेळके, अमित काळे, सुनील चांदणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भीमा बागूल, सचिन साळवे, अतुल त्रिभुवन, मयूर कदम, मयूर सूर्यवंशी, किशोर पंडित, सुनीता थोरात उपस्थित होते.

टाकळीमियातील घटनेच्या निषेधार्थ राहुरी पोलिस ठाण्यावर मोर्चा
डॉ. बाबासाहेब आबेंडकर यांचाही पुतळा व्हावा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात कोणी चुकीचे वागत असेल, तर त्यांची हकालपट्टी केली जाईल, हे स्पष्ट करत टाकळीमिया येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास रिपाइंच्या वतीने पाच लाखांची देणगी जाहीर करतो. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा झाला पाहिजे, अशी, मागणी थोरात यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...